|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात अतिरिक्त आयुक्तांनसह महापौरांसमोर बेदम मारहाण

पुण्यात अतिरिक्त आयुक्तांनसह महापौरांसमोर बेदम मारहाण 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यात अतिरिक्त आयुक्त असलेल्या राजेंद्र निंबाळकर यांना महापौरांसमोरच बेदम मारहाण करण्यात आली. नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून महापौर दालनात हे कृत्य करण्यात आले. जलपर्णी हटवण्याच्या गैरव्यवहाराबाबत विचारणा करत असताना ही घटना घडली. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या. महापालिकेमध्ये दुपारच्या सुमारास अशाप्रकारची घटना घडल्याने त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्मयता आहे.

   जलपर्णी गैरव्यवहारात भाजपाचे पदाधिकारी आणि अधिकारी यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महापौर दालनात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान दोषी अधिकाऱयांवर कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकानी महापौरकडे केली. ज्यांनी निविदा काढल्या त्यांच्याकडून खुलासा नको, अधिकारी चोर आहेत अशा घोषणाही कार्यकर्त्यकडून देण्यात येत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त निंबाळकर त्याठिकाणी उपस्थित होते.