ऍमेझॉनकडून यूपीआय सुविधा

मुंबई
ई-कॉमर्स कंपन्यांपैकी ऍमेझॉनने भारतात पेटीएम आणि फोनपेला टक्कर देत स्वतःची यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सुविधा सुरू केली आहे. ऍक्सिस बँकेशी सल्लग्न ही सुविधा असून ऍमेझॉन ऍप्लिकेशनवर उपलब्ध करण्यात आली आहे. वापरकर्त्यांनी या सुविधेसाठी त्यांच्या बँक खात्याला यूपीआय ऍपशी लिंक करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतर पेटीएम, फोनपे या ऍपप्रमाणे पैसे पाठविणे किंवा प्राप्त करणे उपलब्ध होणार आहे. बँक खाते क्रमांक आणि बँक आयएफएससी कोडची गरज यूपीआय सर्व्हिसमध्ये गरजेची नाही. फक्त व्हर्च्यूअल पेमेंट ऍड्रेसच्या आधारे कुठेही पैसे पाठवता येणार आहे.
डिजीटल इंडियासाठी सरकारकडून भीम ऍप्लिकेशन सुरू करण्यात आले होते. अनेकांना ज्यामुळे फायदा झाला होता. शिवाय गुगलपे सारख्या ऍप्लिकेशनचा सुद्धा मोठय़ाप्रमाणात वापर होत आहे. अशात आता ऍमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीने ही सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या सुविधेमुळे बँकेतील रांगा कमी होण्यास मदत होत आहे.