|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम शिवसेनेच्या संपर्कात

राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम शिवसेनेच्या संपर्कात 

आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक

प्रतिनिधी/ सोलापूर

राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम शिवसेनेच्या संपर्कात असून, आगामी लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक शिवसेनेकडून लढविण्यासाठी इच्छूक आहेत. युती झाल्यास आ. रमेश कदम मोहोळ विधानसभा लढवतील, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर यांनी पत्रकार परिषदेत †िदली.

   युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आजपासून सोलापुरातील दुष्काळी गावातील शेतकऱयांना चारा व पाण्याच्या टाक्या वाटणार आहेत. यासंदर्भात माहिती देण्यासाठी सोमवारी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी वानकर बोलत होते.

  अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा केल्याबद्दल सध्या राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम जेलमध्ये आहेत. मात्र तुरूगांत राहूनसुद्धा आगामी निवडणुकीसाठी मोहोळ मतदारसंघातून त्यांची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. आगामी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी शिवसेनेकडून लढविण्यासाठी कदम इच्छूक असल्याची माहिती वानकर यांनी दिली. शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याची इच्छा आ. कदम यांनी जिल्हाप्रमुखांकडे केली होती आणि ही महिती मी वरिष्ठांकडे पाठविली आहे.

  यापुढे वरिष्ठ जे निर्णय घेतील तेच होईल. दरम्यान, आमदार रमेश कदम शिवसेनेकडे संपर्क साधला आहे, शिवसेना स्वतः गेली नाही अशी स्पष्टोक्ती वानकर यांनी केली. आगामी निवडणूक संदर्भात मुंबई बैठकीत झालेली असून सोलापूर जिह्यात लोकसभेसाठी कोणता उमेदवार असणार हे पक्षप्रमुख ठरवतील. आमदार कदमांसह इतर पक्षातील तीन उमेदवार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आगामी निवडणूकीत कुणाला कोणत्या मतदारसंघातून तिकीट मिळणार हे पक्षश्रेष्ठी ठरवतील.