|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बळीपवाडी येथे हरिनाम सप्ताहास प्रारंभ

बळीपवाडी येथे हरिनाम सप्ताहास प्रारंभ 

वार्ताहर/ परळी

मौजे गोळेवाडी (गजवडी, बळीपवाडी) येथे रविवार 10 फेब्रुवारी रोजी ते रविवार 17 फेब्रुवारी रोजी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी दैनंदिन कार्यक्रामात पहाटे 4 ते 6 काकड आरती, 8 ते 11 ज्ञानेश्वरी वाचन. दुपारी 3 ते 5 ज्ञानेश्वरी वाचन, 6 ते 7.30 हरिपाठ, रात्री 9 ते 11 किर्तन, 11 ते रात्री 1 जागर अशा पद्धतीने
कार्यक्रमाचे स्वरुप असणार आहे.

10 फेब्रुवारी रोजी ह.भ.प. मारुती महाराज निगडकिर यांचे किर्तन झाले. तर सोमवार 11 फेबुवारी रेजी ह.भ.प. सुदर्शन महाराज नलावडे यांचे किर्तन झाले. मंगळवार 12 रोजी ह.भ.प. पावशे महाराज (आळंदी), 13 रोजी ह.भ.प. सोमनाथ गायकवाड महाराज (वाठार किरोली) यांचे किर्तन होणार आहे. गुरुवार 14 रोजी ह.भ.प. उमेश किर्दत महाराज (चिंचणेर), शुक्रवार 15 रोजी ह.भ.प. संतोष ढाणे महाराज (पाडळी) यांचे किर्तन होणार आहे. शनिवार 16 रोजी ह.भ.प. प्रविण शेलार महाराज (आंबेघर), रविवार 17 रोजी ह.भ.प. राम कदम महाराज (डबेवाडी) यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शनिवार 16 रोजी सायंकाळी 7 वाजता श्रीधर महाराज कंग्राळकर, ह.भ.प. चंद्रकांतदादा वांगडे महाराज (नित्रळ), ज्ञानेश्वर वांगडे (भाई) यांच्या हस्ते दिपोत्सव करण्यात येणार आहे. 17 रोजी काल्याचे किर्तन व दुपारी 3 ते 5 दिंडी सोहळा व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे अवाहन केले आहे.