|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पैगीण पंचायतीमध्ये हायवेवरील वाहनांच्या सदंर्भात बैठक

पैगीण पंचायतीमध्ये हायवेवरील वाहनांच्या सदंर्भात बैठक 

प्रतिनिधी/ काणकोण

करमलघाट ते पोळे पर्यतच्या रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी स्पीड मर्यादा फलक लावणे, गतीरोधक बसविणे, दारूच्या नशेत वाहने हाकणाऱयांविरूद्ध कारवाई करताना वाहन चालकांची अल्कोमीटरच्या सहाय्याने वारंवार तपासणी करणे, क्षमतेपेक्षा अधिक माल आणणाऱया वाहनांची तपासणी करणे, रस्त्याच्या बाजूला असलेली वाहतुकीला अडथळा करणाऱया झाडांची छाटणी करणे, हायवेवर पेट्राल पंपाजवळ वाहने पार्क करायला मनाई करण्या संदर्भात पैंगीण पंचायतीमध्ये घेतलेल्या विशेष बैठकीत चर्चा करण्यात आली.

15 दिवसांच्या आत या सर्व गोष्टीवर कारवाई करून अहवाल सादर करण्याचा आदेश उपजिल्हाधिकारी सगुण वेळीप यांनी दिला आहे. पैंगीण येथे 9 रोजी झालेल्या मालवाहू वाहनांच्या अपघातात चार दुकाने बेचिराख झाली त्या संदर्भात वाहतुकीवर तोडगा काढण्याच्या सदंर्भात ही बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला लोलयेचे सरपंच अजय लोलयेकर, पंच शैलेश पागी, पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर, उपसरपंचा एल्डा फर्नाडिस, विपीन प्रभुगावकर,  पंच प्रवीण भंडारी, रूद्रेश नमशीकर, सरीता पागी, माजी उपसरपंच सतीश पेगीणकर, जनार्दन भंडारी, व्यंकटराय नाईक, दिलीप केंकरे, प्रदीप पैगीणकर, रूपेश पैगीणकर, अरूण प्रभुदेसाई, दिलीप भंडारी, आणि अन्य नागरीक मोठया संख्येने अपस्थित होते. या रस्त्यावरून मालवाहू वाहने बेफाम पणे हाकली जातात माशे, पैंगीण आणि अर्धफोंड पूलाची तपासणी करण्यात यावी.,. दारुच्या नशेत वाहने हाकणाऱयाविरूद्ध कारवाई करण्यात यावी,, वारंवार रस्त्याचे चालू असलेले खोदकाम रोखण्यात यावे अशी मागणी अजय लोलयेकर, सतीश पैगीणकर ,जनार्दन भंडारी, व्यंकटराय नाईक, दिलीप केंकरे यानी यावेळी केली.

उपजिल्हाधिकारी सगुण वेळीप यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आलेल्या या बैठकीला मामलेदार रघुराज फळदेसाई, पोलिस उपाधिक्षक उत्तम रा. देसाई,,  वाहतूक खात्याचे विनोद आर्लेकर, कल्पेश फळदेसाई, अबकारी निरीक्षक प्रमोद जुवेकर, पो. नि. राजेंद्र प्रभुदेसाई, वाहतूक निरीक्षक गौतम साळुंके, वनअधिकारी प्रकाश नाईक, हायवे, इमारत, रस्ता विभागाचे अभियंता, पंचायत सचिव राजीव ना. गावकर, आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाती अधिकारी उपस्थित होत.

गुळे ते पोळे पर्यतच्या रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी धोकादायक झाडे वाढलेली आहेत. ज्या ठिकाणी गतीरोधक आणि वेग मर्यादा फलक लावायचे आहेत. त्या सदंर्भात येत्या 19 रोजी पैंगीण आणि लोलये पंचायतीचें सरपंच, पंच, स्थानिक नागरीक, वन खाते, हायवे, वाहतूक आणि पोलिस खात्याच्या अधिकाऱयांसहित उपजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासणी केली जाई. त्यापूर्वी 15 रोजी संध्याकाळी राष्ट्रीय आपत्कालिन व्यवस्थापनाच्या बैठकीत यावर चर्चा करून तोडगा काढण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी श्री. वेळीप यानी स्पष्ट केले. या बैठकीचे स्वागत अजित पैगीणकर यानी केले तर रूद्रेश नमशीकर यानी आभार मानले.

दरम्यान 9 रोजी अपघातग्रस्त झालेले वाहन एकाच वेळी दोन क्रेन लावून बाहेर काढण्यात आले. ज्या दुकानमालकांची या अपघातात दुकाने बेचिराख झालेश्ली आहेत. त्यातील या अपघातात गाडलेले सामन बाजूला करण्याचे काम सद्या चालू करण्यात आली आहे. त्याच बरोबर या घटनेचा पंचनामा करण्यात आला असल्याची माहिती पो.नि. राजेंद्र प्रभुदेसाई यानी दिली. या रस्तयावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम यापुढे पोलिसांमार्फत करण्यात येणार असल्याचे त्यानी सांगितले.