|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » 16 रोजी पासपोर्ट मेळावा

16 रोजी पासपोर्ट मेळावा 

बेळगाव  / प्रतिनिधी

बेळगावमध्ये पोस्ट-पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होवून एक वर्ष होत असल्याने शनिवार दि. 16 रोजी पासपोर्ट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन सेवा देण्यात येत असली तरी ग्राहकांना 20 दिवस वाट पहावी लागत असल्याने पासपोर्ट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना लवकर पासपोर्ट मिळण्यास मदत होणार आहे.

पूर्वी हुबळी येथे जावून पासपोर्ट काढावा लागत होता. परंतु हे येणे-जाणे त्रासदायक असल्याने पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून बेळगावमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले. पोस्टमन सर्कंल (अंबाभुवन) येथील मुख्य पोस्ट कार्यालयात हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र सुरू झाल्यापासूनच बेळगावच्या नागरिकांना परदेशी जाण्याचा परवाना सहज उपलब्ध होवू लागला आहे.

पूर्वी या सेवाकेंद्रातून दररोज 50 जणांना पासपोर्ट देण्यात येत होता. पासपोर्ट काढणाऱयांची संख्या पाहून ही संख्या 75 करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यापासून ही पासपोर्टची मर्यांदा आता 100 करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना पासपोर्ट काढणे आता सहज शक्मय होत आहे. तरी कागदपत्रांची पडताळणीसाठी वेळ लागत असल्याने 20 दिवसांचा कालावधी लागत आहे.

पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होवून फेबुवारी महिन्यात वर्ष होत आहे. यासाठी बेळगावच्या पासपोर्ट कार्यालयाने शनिवारी पासपोर्ट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना सहज पासपोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.