|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मयत सदस्यांची माहिती संग्रहित करा

मयत सदस्यांची माहिती संग्रहित करा 

बेळगाव / प्रतिनिधी

अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने नवनवीन नियम लागू करण्यात येत आहेत. आता कार्डधारक कुटुंबातील मयत झालेल्या सदस्यांची माहिती संग्रहित करण्याची सूचना करण्यात आली आहे. हे काम संबंधित रेशन दुकानदारांनी करावे, अशी सूचना दुकानदारांना करण्यात आली आहे. मात्र, खात्याच्या या नव्या फतव्यामुळे रेशन दुकानदारांसमोर मयत सदस्यांची माहिती संग्रहित करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

सध्या बीपीएल आणि अंत्योदय रेशन कार्डधारकांना दर महिन्यास तांदूळ आणि गव्हाचे वाटप करण्यात येत आहे. सदस्य संख्येनुसार तांदूळ वाटप सुरू आहे. मात्र, असंख्य कार्डधारक कुटुंबातील काही सदस्य मयत झाले आहेत. तरीही या कार्डधारकांनी त्यांची नावे आपल्या रेशन कार्डातून कमी केलेली नाहीत. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने मयत सदस्यांची नावे कमी करावीत, अशी सूचना करण्यात आली होती. मात्र, असंख्य कार्डधारकांनी नावे कमी केली नाहीत. तसेच मयत सदस्यांच्या नावाचे रेशन दर महिन्यास घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे दर महिन्यास असंख्य टन तांदळाचे वाटप मयत सदस्यांच्या नावाने सुरू आहे. याचा लाभ कार्डधारक कुटुंबे घेत असून, खात्याला नुकसान सोसावे लागत आहे. यामुळेच मयत सदस्यांची माहिती संग्रहित करून त्यांची नावे वगळण्याची सूचना करण्यात आल्याचे खात्याच्या अधिकाऱयांनी सांगितले.

प्रत्यक्षात हे काम खात्याच्यावतीने होणे गरजेचे आहे. मात्र, ही जबाबदारी शहर आणि तालुक्मयातील रेशन दुकानदारांवर सोपविण्यात आली आहे. यामुळे रेशन दुकानदारांमधून नाराजी व्यक्त होत आहे. परंतु खात्याच्या आदेशाचे पालन करणे कर्तव्य मानून रेशन दुकानदारांना हे काम करावेच लागणार आहे. यासाठी रेशन दुकानदार कोणते उपाय करणार हे पाहावे लागणार आहे. रेशन कार्डधारक कुटुंबीयांना पुन्हा रांगेत उभे राहावे लागणार का? हेसुद्धा लवकरच कळणार आहे.