मोहसीन शेखच्या हत्येचा आरोपी धनंजय देसाईसह दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / पुणे :
जमावबंदी आदेशाचा भंग करुन पुण्यात बेकायदा रॅली काढल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई आणि त्याच्या शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगणक अभियंता मोहसीन शेख हत्येप्रकरणी जामीनावर सुटका झालेल्या धनंजय देसाईच्या समर्थनार्थ त्याच्या कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे घेऊन पुण्यात रॅली काढली होती.
2014 मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात दंगल उसळली होती. या दंगलीत संगणक अभियंता मोहसीन शेख याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह 23 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.