|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » मतविभाजन टाळण्यासाठी मनसेने एकत्र यावे : अजित पवार

मतविभाजन टाळण्यासाठी मनसेने एकत्र यावे : अजित पवार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आगामी निवडणुकीत मत विभाजन टाळण्यासाठी मनसेने एकत्र यायला हवे. एखाद-दुसऱ्या जागेसाठी ताणून धरु नये, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच राजू शेट्टींचे गैरसमज दूर करु, असेही अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

 

लोकसभेत भाजप-शिवसेनेचा पराभव करायचा असेल तर धर्मनिरपेक्ष विचारधरा ठेवून एकत्र आले पाहिजे. मनसेनेही मागील वेळी एक लाख मते घेतली होती. त्यामुळे माझे वैयक्तिक मत आहे की, मागच्या गोष्टी मागे सारुन मतविभाजन टाळण्यासाठी सगळय़ांनी एकत्र आले पाहिजे,असे अजित पवार म्हणाले. पार्थ पवार मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, “आजकाल मुलं त्यांचा निर्णय स्वतः घेतात. पार्थबाबत पक्षाने अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नाही. निवडणुकीच्या प्रचाराला फिरायला लागला म्हणजे निवडणूक लढवणार असं होत नाही. शिवसेना आणि भाजप युती होणार हे नक्की. हे दबावाचे राजकारण आहे. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी चर्चांचे सत्र सुरु आहे. ते हा मुद्दा ताणतील पण तुटू देणार नाहीत, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.

 

Related posts: