|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » स्विगी ऍपवरून ऑर्डर केलेल्या चिकन नुडल्समध्ये आढळले वापरलेले ‘बँडेज’

स्विगी ऍपवरून ऑर्डर केलेल्या चिकन नुडल्समध्ये आढळले वापरलेले ‘बँडेज’ 

ऑनलाईन टीम / चेन्नई :

तामिळनाडूतील चेन्नईमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्विगीमधून ऑर्डर केलेल्या अन्नामध्ये चक्क वापरेले बँडेज आढळून आले आहे. विशेष म्हणजे या बँडेजवर रक्ताचे दागही दिसत आहेत. शहरातील बालामुरगन यांनी रविवारी स्विगी अप्प्सच्या  माध्यमातून एका हॉटेलमधून जेवण मागविले होते. फूड सर्व्हीस कंपनी स्विगीने ही ऑर्डर ग्राहकापर्यंत पोहोचवली. मात्र, निम्मे जेवण झाल्यानंतर या जेवणात बँडेड आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बालामुरगन यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. तसेच ही बातमी शेअर करताना बालामुरग यांनी ओमिटच्या इमोजीचा वापर केला आहे. शहरातील एका रेस्टॉरंटमधून मी चिकन शेजवान नुडल्स मागविले होते. मात्र, या नुडल्समध्ये वापरलेल बँडेज आढळून आल्याच या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. याबाबत संबंधित रेस्टॉरंटला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कुठलेही प्रतिउत्तर मिळाल नाही. याउलट आपण स्विगी अप्प्सद्वारेच दुसऱयांदा जेवणाची ऑर्डर करण्याचा पर्याय सूचविण्यात आला. मात्र, स्विगीशीही थेट फोनद्वारे संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे केवळ अप्प्सद्वारे चॅटिंग करुनच ही तक्रार सांगण्याचा पर्याय माझ्याकडे असल्याचे बालामुरगन याने म्हटले आहे. दरम्यान, स्विगी आणि संबंधित हॉटेलमध्ये ग्राहकांच्या जेवणाची किती काळजी घेतली जाते, हा खरा प्रश्न आहे. तसेच, जेवण बनवणारे आचारी हँडग्लोज वापरतात का, स्विगीचे कर्मचारीही तशी काळजी घेतात का, असा प्रश्नही या फेसबुक पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आला आहे. स्विगी अप्प्स वापरकर्त्यांनी याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. तर संबंधित रेस्टॉरंटमधील कर्मचाऱयांनीही ग्राहकांना पुरविण्यात येणाऱया अन्नाबाबत सतर्क असावे. तसेच स्विगीनेही आपल्या ऍपच्या माध्यमातून अन्नसेवा पुरविणाऱया रेस्टॉरंटची निवड करताना, योग्य ती काळजी आणि खात्री करणे, आवश्यक असल्याचे बालामुरगन यांनी म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप स्विगीकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसून केवळ investigate and get back to me in a day or two असा मेसेज कंपनीकडून आल्याचेही मुरगन म्हणाले.