|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » लातूरमध्ये अल्पवयीन बहीन-भावाचे अपहरण

लातूरमध्ये अल्पवयीन बहीन-भावाचे अपहरण 

ऑनलाईन टीम / चाकूर :

आष्टामोड येथून अल्पवयीन बहीण-भावाचे अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील कडप्पा जिह्यातील एक कुटुंब चाकूर तालुक्मयातील आष्टामोड येथे साडीविक्रीच्या व्यवसायासाठी आले आहे. नेहमीप्रमाणे मल्लीकार्जुन बालस्ता आणि त्यांची पत्नी साडी विक्रीसाठी बाहेरगावी गेले होते. दरम्यान, इकडे घरासमोर खेळत असलेल्या भावाचा मुलगा (12), मुलगी (8) यांचे अज्ञातांनी अपहरण केल्याची घटना घडली. घरी परतल्यानंतर त्यांना आपल्या भावाचा मुलगा आणि मुलगी गायब झाल्याचे दिसून आले. त्यांचा आष्टामोड परिसरात शोध घेतला असता, ते आढळून आले नाहीत. याबाबत चुलते मल्लकार्जुन दस्तगीर बालस्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चाकूर पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञाताविरोधात गुरनं. 35/2019 कलम 363 भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गिते हे करीत आहेत.

Related posts: