|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » वैमानिकांचा तुटवडा ; इंडिगोची 30 उड्डाणे रद्द

वैमानिकांचा तुटवडा ; इंडिगोची 30 उड्डाणे रद्द 

ऑनलाईन टीम / मुंबई :

इंडिगो एअरलाइन्सला वैमानिकांचा तुटवडा चांगलाच भोवतोय. मंगळवारीही उड्डाणे रद्द करण्याचे सत्र सुरूच होतं. इंडिगोने सुमारे 30 उड्डाणे रद्द केली. परिणामी प्रवाशांना आयत्या वेळी जास्त पैसे मोजून तिकिटे खरेदी करावी लागली.

    दरम्यान, ’सोमवारीदेखील कंपनीने 32 उड्डाणे रद्द केली होती. आयत्या वेळी उड्डाण रद्द केल्याने प्रवाशांना पर्यायी व्यवस्थेसाठी जादा पैसै मोजावे लागले. डीजीसीएकडून अद्याप यासंबंदी कोणत्याही चौकशीचे संकेत देण्यात आलेले नाहीत. इंडिगो गेल्या शनिवारपासून वैमानिकांच्या तुटवडय़ामुळे उड्डाणे रद्द करत आहे. मंगळवारी 30 उड्डाणे रद्द केली. ही उड्डाणे कोलकाता, हैदराबाद आणि चेन्नईहून रवाना होणार होती. यापैकी कोलकातातून आठ, हैदराबादहून पाच, बेंगळुरूहून चार आणि उर्वरित चेन्नईची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.