|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » पॅरिसमध्ये 48 वर्षांपुर्वीच्या दुचाकीची 1 कोटीना विक्रीचा अंदाज

पॅरिसमध्ये 48 वर्षांपुर्वीच्या दुचाकीची 1 कोटीना विक्रीचा अंदाज 

ऑगस्ता 1945 मधील सर्वात जुनी कंपनी, भारतात चार मॉडेल उपलब्ध

वृत्तसंस्था/ पॅरिस

फ्रान्सची राजधानी असणाऱया पॅरिस शहरात जवळपास 100 एमवी अगस्ता क्लासिक असणाऱया दुचाकीचा लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव एक कोटी रुपयाहून अधिकच्या किंमतीना होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अगोदर 1978मध्ये एमवी अगस्ता 750 दुचाकी 88.5 लाख रुपयाना विकण्यात आली होती. एमवी(मॅकेनिका वर्घेरा)इटलीमधील खुप प्रसिद्ध असा हा मोटारसायकल ब्रॅण्ड म्हणून ओळखला जातो.

काऊन्ट डोमेनिको अगस्ता नाव असणाऱया एका गृहस्ताने 1945 साली अगस्ता नावाने दुचाकीची कंपनी स्थापन केली होती. परंतु 1971 साली काऊन्ट यांचे निधन झाले आणि त्यानंतर पुढील पाच वर्ष या दुचाकीने रेसिंगमध्ये सहभाग घेण्याचे बंद केले हेते. पण 270 ग्राप्री आणि38 वर्ल्ड रायडर टायटल आणि 37 वर्ल्ड कन्स्ट्रक्टर चॅम्पीयनीशिप जिंकली होती. भारतात अगस्ताचे चार मॉडेल उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

दोन आठवडय़ापुर्वी लॉस वेगास ची 1975 मधील दुचाकी डुकाटीची 1.73 कोटीना लिलाव करण्यात आला. मागील वर्षात 1970 सालचे मॉडेल टीटीएस मॅमट बाईकची 1.52 कोटी रुपयाना लिलाव करण्यात आला होता.