|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » स्विगीकडून स्टोअर्स सुविधा सुरु

स्विगीकडून स्टोअर्स सुविधा सुरु 

लहान दुकानदार जोडणीतून नवीन ग्राहक तयार करण्यावर कंपनीचा भर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशांतर्गत बाजारात ऑनलाईन पद्धतीचा वापर करुन त्यांच्या आधारे ग्राहकांच्या घरापर्यंत खाणे पार्सल पोहचवण्यात सध्या अग्रेसर असणाऱया स्विगी कंपनीने स्टोअर्स सुरुवात केली आहे. कंपनी वाढत्या ग्राहकांच्या मागण्या आणि त्याला अनुसरुन त्या पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारे बदल करत असल्याचे नोंदवण्यात आले आहे.

दैनदिन वापरात लागणाऱया वस्तुंचा पुरवठा करणाऱया आवश्यक गोष्टीचा पुरवठा करण्यासाठी स्विगीने नवीन योजना मंगळवारी सुरु केली आहे. यामध्ये लहान दुकानदारांना लागणाऱया उत्पादनांचा सदर योजनेत समावेश करण्यात येणार आहे. आरोग्याला पूरक असणारी उत्पादनेही यात अगोदर पुरवठा केला जाणार असल्याचे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले.

जीवनावश्यक वस्तुंचा समावेश

दैनदिन वापरात असणाऱया उत्पादनाचा नवीन व्यासपीठावर उपयोग करण्यात येणार आहे. लहान मुलांच्या आरोग्य विषयक वस्तु, किराणा वस्तू ,भाज्या यांचा पुरवठा केला जाणार असून ही सुविधा लागू करत असताना प्रत्येक उत्पादनांची वर्गवारी करण्यात आल्यावरच प्रत्यक्षपणे या वस्तुंचा पुरवठा होणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

अन्न पुरवठा व्यासपीठ

अन्न पुरवठय़ाचे व्यासपीठाचा बाजारातील अनेक दुकानदार जोडण्यासाठी एक सुलभ व योग्य विश्वासाचे व्यासपीठ म्हणून त्याची भविष्यात उभारणी होणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. 

विविध क्षेत्रात विस्तार

कंपनी आपल्या आगामी काळात ग्राहकांच्या मागणीवर आधारीत अन्य योजना लवकरच बाजारात आणणार असून लहान दुकानदारांची जोडणी करुन बाजारातील अधिकचे ग्राहक जोडणी करण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मजेती यांनी व्यक्त केला आहे.