|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वाहनाच्या धडकेत दोघे तरुण ठार

वाहनाच्या धडकेत दोघे तरुण ठार 

सोलापूर :

सोलापूर-विजापूर महामार्गावरील एजी पाटील कॉलेज समोरील रस्त्यावर शनिवारी पहाटे 5 च्या सुमारास दुचाकीवरुन जाणाऱया तरुणांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने विजापूर रोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ओंकार शिवानंद मेहता (वय 23, रा. सिध्देश्वर नगर, विजापूर रोड, सोलापूर) व सचिन विश्वनाथ याळगी (वय 25, रा. बेघर सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत.

शनिवारी पहाटे ओंsकार आणि सचिन हे एमएच /13/सीसी/3031 या दुचाकीवरुन डबलसिट बसून शहराकडे येत होते. दरम्यान एजी पाटील कॉलेज समोरील रस्त्यावर असलेल्या काका हॉटेलसमोर आल्यानंतर पाठीमागून वेगाने येणाऱया अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ओंकार आणि सचिन यांना बेशुध्द अवस्थेत पोलीस नाईक चव्हाण यांनी शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच दोघेही मरण पावल्याचे येथील डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.

Related posts: