|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » बॉलिवूड निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन

बॉलिवूड निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन 

ऑनलाईन टीम /  मुंबई :

राजश्री फिल्मचे संस्थापक आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचे आज सकाळी निधन झाले. मुंबईतील सर हरकिसनदास रिलायन्स फाऊंडेशन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते प्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे वडिल होत. त्यांच्या मागे पत्नी सुधा बडजात्या आणि मुलगा सूरज बडजात्या असा परिवार आहे.


ट्रेड अ‍ॅनालिस्ट  कोमल नहता यांनी आपल्या ट्विटर  अकाऊंटवर राजकुमार यांच्या निधनाची बातमी शेअर केली. काहीच मिनिटांपूर्वी राजकुमार बडजात्या यांचे निधन झालेत. मला विश्वास बसत नाहीये. आठवडाभरापूर्वी त्यांच्या प्रभादेवी कार्यालयात मी त्यांना  भेटलो होतो, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले.राजकुमार यांच्या राजश्री प्रॉडक्शनने एकापेक्षा एक दमदार चित्रपटांची निर्मिती केली.  १९७२ साली आलेला पिया का घर, १९९४ मध्ये गाजलेला हम आपके है कौन, १९९९ चा हम साथ साथ है, असे अनेक चित्रपट राजश्री प्रॉडक्शनने दिलेत. गत १५ फेबु्रवारीला राजकुमार यांची निर्मिती असलेल ‘हम चार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

Related posts: