|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » अखेर ‘त्या’ 6 वर्षांच्या मुलाला बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश

अखेर ‘त्या’ 6 वर्षांच्या मुलाला बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश 

ऑनलाईन टीम /  निरगुडसर :

आंबेगाव तालुक्यातील रांजणी जाधववाडी येथे संपत जाधव यांच्या शेतातील रस्त्याच्या कडेला असलेल्या बोअरवेलमध्ये 6 वर्षांचा रवी पंडित मिल नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना बुधवारी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मुलाला बोअरवेलमधून सुखरुप काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्या बोअरवेलमधून 15 तासांनंतर मुलाला बाहेर काढण्यात यश आलं आहे. एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळेच मुलाला वाचविण्यात यश आले  आहे.
बोअरवेलमध्ये पडलेला मुलगा रस्त्याचे काम करणाऱ्या मजुराचा मुलगा असून दुपारच्या सुमारास रस्त्याचे काम करीत असताना मुलगा आई-वडिलांची नजर चुकवून त्या ठिकाणी खेळत असताना ही घटना घडली. ज्या बोअरवेलमध्ये हा मुलगा पडला तो बोअरवेल सुमारे 200 फूट खोल होती.  सुदैवाने मुलगा 10 ते 15 फूट खोलीवर अडकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा मुलगा रवी मूळचा शेगावचा असून रवीचे आई-वडील रोडवर मजुरीने काम करतात. मंचर पोलिसांच्या सहकार्याने  एनडीआरएफच्या टीमने  मुलाला सुखरूप वाचवले  आहे. परिसरातील नागरिकांना ही घटना समजल्यापासून घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आहे.

Related posts: