|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » अवैध दारू तस्करांची महिलांना मारहाण ; पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक

अवैध दारू तस्करांची महिलांना मारहाण ; पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक 

ऑनलाईन टीम / यवतमाळ :

जिह्यातील ढाकोरी गावातील महिलांनी दुचाकीवरुन अवैध दारु तस्करी करणाऱयांना पकडले असता तस्करांनी महिलांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. शिवाय दारु विकेत्यांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिह्यातील वणी तालुक्मयातील अनेक गाव अवैध दारू विक्री मुळे त्रस्त आहेत. यवतमाळ जिह्याच्या शेजारी असलेल्या चंद्रपूर जिह्यात दारूबंदी आहे. अशावेळी चोरट्या पद्धतीने अवैध दारू विपेते दारू तस्करी करतात. दुचाकीवरुन अवैध दारु तस्करी केली जात आहे, अशी माहिती ढाकोरी गावातील महिलांना मिळाली. ढाकोरी गावातील महिलांनी एकत्र येत रात्री 9 वाजताच्या सुमारास दारु तस्करी करणाऱयांना पकडले. यावेळी या महिला दारु तस्करांना घेऊन शिरपूर पोलीस स्टेशनकडे जात असताना दारु विपेत्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी कुराई गावाजवळ अडवून महिलांना मारहाण केली. शिवाय दारु तस्करीसाठी वापरण्यात आलेली दुचाकीही पेटवून दिली. मारहाणीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता दारु विपेत्यांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यादरम्यान पोलिसांनी गाडीतून पळ काढला. संधी साधून दारू विपेत्यांनी पोलिसांची गाडी उलटवून दिली. त्यानंतर मोठय़ा फौजफाटय़ासह पोलीस कुराई गावात पोहोचले. त्यादरम्यान पोलिसांनी काही दारु विपेत्यांना ताब्यात घेतले. दारु विपेत्यांकडून झालेल्या मारहाणीमध्ये सहा महिला जखमी झाल्या असून एका महिलेच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या महिलांचे जवाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. अवैध दारू विपेत्यांची पोलीस धरपकड करीत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.