|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘विकासाचे यशवंतयुग’ पुस्तकातून महाराष्ट्राचा इतिहास उलगडला

‘विकासाचे यशवंतयुग’ पुस्तकातून महाराष्ट्राचा इतिहास उलगडला 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकिर्दीत शिक्षण, कृषी, सहकार, कृषी-औद्योगिकीकरण, सामाजिक सुधारण व सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून केलेले विकासकार्य आदी पैलू ‘विकासाचे यशवंतयुग’ या पुस्तकातून लेखक प्रा. तानाजी घागरे यांनी उलगडले आहेत.

महाराष्ट्राचे शिल्पकार व देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठातील  ‘विकासाचे यशवंतयुग’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटमधील सहाय्यक प्रा. तानाजी नामदेव घागरे यांनी हे पुस्तक लिहीले आहे.

दरम्यान विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखा अधिकारी व्ही.टी. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. नितीन माळी, डॉ. अमोल मिणचेकर यांच्यासह यशवंतराव चव्हाण स्कूलचे अन्य शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related posts: