|Friday, May 24, 2019
You are here: Home » क्रिडा » बार्सिलोना, लिव्हरपूल उपांत्यपूर्व फेरीत

बार्सिलोना, लिव्हरपूल उपांत्यपूर्व फेरीत 

वृत्तसंस्था /बार्सिलोना :

लायोनेल मेसीच्या शानदार दोन गोलांच्या जोरावर बार्सिलोना संघाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व गाठताना ऑलिंपिक लायोनेसचा पराभव केला तर लिव्हरपूल संघाने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून त्यांनी बायरन म्युनिचचा फडशा पाडला.

बुधवारी झालेल्या सामन्यात बार्सिलोनाने ऑलिंपिक लायोनेसचा 5-1 अशा गोलफरकाने पराभव केला. त्याचप्रमाणे बार्सिलोनाने ऑलिंपिक लायोनेसवर सरासरी 5-1 अशा फरकाने मात करत शेवटच्या आठ संघांत स्थान मिळविले. या सामन्यात 17 व्या मिनिटाला बार्सिलोनाचा कर्णधार मेसीने संघाचे व स्वत:चे खाते उघडले. त्यानंतर लुईस सुवारेंझने बार्सिलोनाचा दुसरा गोल केला. मध्यंतरापूर्वी लुकास टुसेर्टने ऑलिंपिक लायोनेसचे खाते उघडून बार्सिलोनाची आघाडी थोडी कमी केली. 78 व्या मिनिटाला मेसीने वैयक्तिक दुसरा तर बार्सिलोनाचा तिसरा गोल नोंदविला. बार्सिलोनाचा चौथा गोल पिक्वेने केला. बार्सिलोनातर्फे पाचवा आणि शेवटचा गोल बदली खेळाडू डेंबेलीने नोंदवून ऑलिंपिक लायोनेसचे आव्हान संपुष्टात आणले. बार्सिलोना संघाने या युरोपमधील इलाईट स्पर्धेत सलग 12 व्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पॅरीस सेंटजर्मन आणि रियल माद्रीद यांचे आव्हान यापूर्वीच समाप्त झाले आहे. ज्युवेंटस्ने पहिल्या टप्यातील लढतीत ऍटलेटिको माद्रीदचा 2-0 असा पराभव केला आहे.

या स्पर्धेत लिव्हरपूल संघाने बायरन म्युनिचचा 3-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. लिव्हरपूल संघातर्फे सॅडिओ मॅनेने दोन गोल नोंदविले. 26 व्या मिनिटाला मॅनेने लिव्हरपूलचे खाते उघडले. 39 व्या मिनिटाला सर्जी गॅनब्रायने बायरन म्युनिचला बरोबरी साधून दिली. 69 व्या मिनिटाला डिजेकने लिव्हरपूलचा दुसरा गोल नोंदविला. 84 व्या मिनिटाला मॅनेने स्वत:चा दुसरा तर लिव्हरपूलचा तिसरा गोल नोंदवून बायरन म्युनिच आव्हान संपुष्टात आणले.

Related posts: