|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेतही ‘भाजपा’त रुसवे-फुगवे पण, ‘कमळ’साठी एकसंघ

मिरजेतही ‘भाजपा’त रुसवे-फुगवे पण, ‘कमळ’साठी एकसंघ 

के.के.जाधव /मिरज :

सांगली जिह्यात भाजपांतर्गत संघर्षाने चांगलीच उचल खाल्ली आहे. लोकसभा निवडणुकीवरुन हा कलह सतत चव्हाटय़ावर येताना †िदसतो. मिरज विधानसभा मतदार संघही यात मागे नाही. खासदार-आमदारांमधील संघर्ष केव्हाच जगजाहीर झाला आहे. महापौरांच्या कारभारावर तर भाजपाचेच नगरसेवक नाराजी व्यक्त करताना दिसतात. जिल्हा परिषदेत सत्ता बदलावरुन तर पंचायत समितीत निवडणुकीवेळी भाजपाला सतत धक्के बसले आहेत. असे असले तरीही भाजपाच्या कोणत्याही नेत्याची पक्ष सोडण्याइतपत मानसिकता निश्चितच झालेली दिसत नाही. त्यामुळे अंतर्गत संघर्ष †िकतीही असला तरी ‘कमळ’साठी हे सर्व नेते विरोधकांचा एकसंघपणे सामना करणार, हे मात्र निश्चित आहे.

जिह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीला अंतर्गत संघर्ष नवखा नाही. अशा अंतर्गत संघर्षामुळेच या दोन्ही पक्षांना जिह्यातील बहुतांशी हक्काची स्थाने गमवावी लागली आहेत. पण, आजतागायत हा संघर्ष मिटला नाही, हेही तितकेच सत्य आहे. आता याची लागण भाजपालाही झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नेत्यांचाच भाजपामध्ये भरणा झाल्याने अंतर्गत गटबाजी म्हणजे नवल वाटण्यासारख्ये काही नाहीच. सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी प्रमाणेच भाजपाही अशा अंतर्गत संघर्षाने पोखरली गेली आहे. मिरज विधानसभा मतदार संघ यामध्ये आघाडीवर आहे. खासदार-आमदारांमधील संघर्षाने त्याचा प्रारंभ झाला. त्याचे चटके आज महापालिकेबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींनाही बसले आहेत. पंचायत समितीत तर सत्ता टीकविण्यासाठी भाजपाला सतत तारेवरची कसरत करावी लागली आहे. असे असले तरी भाजपात डेरेदाखल झालेले नाराजीतून पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत मात्र अद्याप दिसत नाहीत.

Related posts: