|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पाण्यासाठी महापौरांच्या कार्यालयात नगरसेवकांचा ठिय्या

पाण्यासाठी महापौरांच्या कार्यालयात नगरसेवकांचा ठिय्या 

प्रतिनिधी /सोलापूर :

सोलापूर शहरात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली असून उजनी धरणातून तातडीने पाणी सोडून उपाययोजना करण्यात यावी या मागणीसाठी महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी चक्क महापौरांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन करून लक्ष वेधून घेतले. तसेच सोलापूरकरांना पाणी वेळेवर न मिळाल्यास येत्या 20 एप्रिल रोजी सोलापूर बंदची घोषणा यावेळी उपस्थित नगरसेवकांनी केली.

    सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरूवारी सकाळी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. परंतु या सर्वसाधारण सभेला केवळ नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर आणि प्रभाकर जामगुंडे हे दोनच नगरसेवक उपस्थित राहिल्यामुळे महापौरांनी ही सभा तहकूब केली. त्यानंतर नगरसेवक आनंद चंदनशिवे, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, राजकुमार हंचाटे, अनुराधा काटकर आदींचे आगमन झाले. शहरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेवून बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे आदी नगरसेवकांनी महापौर बनशेट्टी यांच्या कार्यालयात जावून ठिय्या आंदोलन केले. महापौर आणि आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Related posts: