|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » Top News » मसूद अजहरवर फ्रान्सची कारवाई ; संपत्ती जप्त

मसूद अजहरवर फ्रान्सची कारवाई ; संपत्ती जप्त 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

संयुक्त राष्ट्रात ’जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्मया मसूद अजहरवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर चीनने व्हिटोचा वापर केल्यानंतर फ्रान्सने अजहरची संपत्ती जप्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जैशविरोधात फ्रान्स सरकारची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. मसूदच्या बाजूने चीनने व्हिटोचा वापर केल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी चीनवर टीकास्त्र सोडले होते.

   मसूद अजहरचे नाव युरोपीय संघाने तयार केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात येईल असे फ्रान्स सरकारच्या गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. तर, दुसरीकडे दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई करण्याबाबत पाकिस्तानवरही जागतिक दबाव वाढत आहे.