|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘नागकेशर’मध्ये आधुनिक महाभारताचे प्रतिबिंब

‘नागकेशर’मध्ये आधुनिक महाभारताचे प्रतिबिंब 

. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या नागकेशर कांदबरीचे कोल्हापुरात प्रकाशन,

प्रतिनिधी/ कोल्हापूर

राज्यातील गेल्या चाळीस वर्षांतील राजकारणाचा पट ‘नागकेशर’मध्ये आहे. व्यक्तिरेखांच्या यशस्वी गुंफणामुळे कादंबरी जिवंत झाली आहे. अघोरी महत्वाकांक्षा अन् भ्रष्टाचाराच्या विस्तृत मांडणीतून राजकीय वास्तव मांडण्यात लेखक विश्वास पाटील यशस्वी झाले आहेत. त्यांच्या ‘नागकेशर’तून आधुनिक महाभारताचे प्रतिबिंब वाचकांना अनुभवता येईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ‘पानिपत’कार विश्वास पाटील लिखीत नागकेशर कादंबरीचे प्रकाशन बुधवारी सायंकाळी शाहू स्मारक येथे झाले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कादंबरीच्या लेआऊटचे प्रकाशन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी लेखक विश्वास पाटील, समीक्षक प्रा. रणधीर शिंदे, मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता, अनील मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सबनीस म्हणाले, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी अडीच महिन्यात ‘नागकेशर’चे लेखन पूर्ण केले. ‘नागकेशर’मध्ये उपदेश नाही, हे त्यांच्या यशाचे पहिले गमक आहे. संस्कृती आणि प्रकृतीच्या संघर्षात विकृती यशस्वी होते, अघोरी महत्वाकांक्षेचे दर्शन घडवताना गतिमानता राखण्यात नागकेशर कादंबरी यशस्वी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. शिंदे म्हणाले, सहकाराची भरभराट अन् त्याच्या घरघरीचे ऱहासपर्व म्हणजे ‘नागकेशर’ आहे. निवेदनातून गती घेणाऱया कादंबरीत अनेक पात्रे येतात. त्यामुळे राज्यातील साखर कारखानदारीतील राजकारणाचे विदारक दर्शन ‘नागकेशर’मधून घडवण्यात लेखक यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.

‘पानिपत’कार पाटील म्हणाले, सत्ता बदलता येत नाही, सद्यस्थितीत जनता लाचार, कार्यकर्ते गुलाम झाले आहेत. त्यामुळे काही कुटुंबांतील पोराबाळांची ही निवडणूक झाली आहे. आजच्या राजकारणाचे हे विदारक चित्र आहे. ‘सत्ताचक्र’ नाटकातील सहकारमहर्षीचे पात्र तीस वर्षे मनात घर करून होते. त्याच्या घरात सुरू झालेला सत्तासंघर्ष ‘नागकेशर’मध्ये आहे. लेखक म्हणून घडलो, त्यासाठी  पहिले कारण स्त्राr ठरली. त्यातून ‘कायदा’ ही पहिली कथा लिहिली. ऐतिहासिक कादंबऱया लिहिल्या. पण प्रशासनात काम करताना पाहिलेल्या राजकारणाची मांडणी ‘नागकेशर’मध्ये झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसऱया महायुद्धात जानेवारी 1941 मध्ये जपानने ब्रम्हदेशावर आक्रमण केले. यावेळी जपान व ब्रम्हदेशाचे सैन्य समोरासमोर होते. यावेळी गोदाकाठच्या कांचना कागवाडकर यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतली होती. त्यांचा इतिहास जनतेसमोर येणे आवश्यक आहे. कागवाडकर यांच्या जीवनावर लेखन सुरू आहे. तीन महिन्यात ही कादंबरी वाचकांसमोर येईल, असे लेखक विश्वास पाटील यांनी सांगितले.

मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांनी स्वागत केले. मुक्ता नार्वेकर यांनी कांदबरीतील एका भागाचे वाचन केले. माहेश्वरी गोखले यांनी सुत्रसंचालन केले. अनील मेहता यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. रमेश जाधव, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, प्रा. विलास रकटे, विजय अग्रवाल, ताईसाहेब कदम, इंद्रजित सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

Related posts: