|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिह्यातील प्रकल्प पडले कोरडे

जिह्यातील प्रकल्प पडले कोरडे 

अमोल साळुंके/ सोलापूर

जिह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असून, वाढल्या उन्हाळामुळे पाण्याची पातळी  झपाटय़ाने खालावत चालली आहे. पाण्याचे स्त्राsत कोरडे पडले असून जिह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्प देखील कोरडे आहेत. जनावरांना चारा पाणी नाही आणि लोकांना पिण्यासाठी पाणी नाही अशी भीषण परिस्थिती सध्या आहे.

 कमी पर्जन्यमान झाल्याने सोलापूर जिह्यातील मध्यम व लघु जलप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरली नसून त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. जिह्यातील सात मध्यम प्रकल्पामध्ये अत्यंत कमी पाणीसाठा तर 38 लघु प्रकल्पामधील फक्त 2 प्रकल्पात थोडय़ा प्रमाणात पाणीसाठा राहिला असून इतर प्रकल्प कोरडेठाक पडल्यामुळे जिह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

 लघु पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱया 38 लघुप्रकल्पांपैकी 36 प्रकल्प कोरडे पडल्याने ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न †िदवसेंदिवस गंभीर होत चालला असून पाण्याविना माणसांना व जनावरांना दूरवर भटकावे लागत आहे. जिह्यातील अनेक गावे लघु प्रकल्पावर अवलंबून आहेत. मात्र लघुप्रकल्पातच पाणी  नसल्याने मार्च महिन्यांच्या सुरुवातीला पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे.

जिह्यातील मध्यम प्रकल्पामधील मांगी व जवळगाव प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तर बाकीच्या पाच प्रकल्पामध्ये गतवर्षापेक्षा यावर्षी अत्यंत कमी पाणीसाठा  असल्याने ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे.

 सध्या लघु व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले असून उर्वरित प्रकल्पांनीही तळ गाठला असल्याने मार्चमध्येच पाण्याची टंचाई भासू लागली आहे. जिह्यातील सर्व लघु व मध्यम प्रकल्पावर प्रकल्पाच्या आजू बाजूची गावे अवलंबून असतात. परंतु प्रकल्पच कोरडे पडल्याने गाव पातळीवरील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.  त्यामुळे गावकऱयांना शेतातील कामे सोडून घागरभर पाण्यासाठी कोसो दूर भटकावे लागत आहे.

 जिह्यातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱयामध्ये कमी-जास्त प्रमाणात पाणीसाठी आहे. तो पुढीप्रमाणे- कव्हे (39 टक्के), म्हैसगाव (50 टक्के), रिधोरे (60 टक्के), निमगाव (50टक्के), उंदरगाव (37 टक्के), खैराव (2 टक्के), भोपळे (9टक्के) पाणीसाठा आहे. परंतु पुढील महिन्यांत या भागातही पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे.

Related posts: