|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पवन्या साळुंखेसह चार जणांना मोका

पवन्या साळुंखेसह चार जणांना मोका 

प्रतिनिधी/ सांगली

घरफोडी, जबरी चोरी, मोटारसायकल चोरी, मारामारीसह खंडणीसारखे तब्बल 17 गुह्यांची नोंद असणारा गुंड पवन उर्फ पवन्या धमेंद्र साळुंखे (वय 21 रा. वाल्मिकी आवास, जुना बुधगाव रोड, सांगली) याच्यासह चार जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार बैठकीत दिली. दरम्यान, राजकीय झूल पांधरुन वावरणाऱया बडय़ा गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना †िदला.

गुंड पवन साळुंखे, समर्थ भारत पवार (वय 20 रा. वाल्मिकी आवास, जुना बुधगाव रोड, सांगली) यांच्यासह अन्य दोन अल्पवयीनांचा यामध्ये समावेश आहे. काही महिन्यापूर्वी पवन्यासह त्याचा साथीदार समर्थ पवार व अन्य दोघांनी वाल्मिकी आवासमध्ये नशेत धुडगूस घातला होता. दिसेल त्याला काठी आणि दगडाने मारहाण केली होती. यामध्ये एका मुलीसह तीन जण जखमी झाले होते. दरम्यान पवन्या व त्याच्या साथीदारांच्या त्रासाला कंटाळलेल्या वाल्मिकीमधील नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होती. शहर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत पवन्या, समर्थ व त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना अटक केली होती.

वाल्मिकीमधील गुन्हेगारी मोडीत

वारंवार कारवाई करुनही पवन्या व त्याच्या गँगचा उपद्रव सुरुच राहील्याने त्याच्या विरोधात ‘मोका’चा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगली शहरचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांना दिले आहेत. पाटील यांनी मोकाचा प्रस्ताव तयार करुन तो पोलीस अधीक्षक शर्मा यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार त्याच्यासह चार जणांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे सांगत पोलीस अधीक्षक शर्मा म्हणाले, पवन्यासह त्याच्या गँगवर खंडणी, मारामारी, जबरी चोरी सारखे 17 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यासह गँगवर कारवाई झाल्याने वाल्मिकीमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यात पोलिसांना यश आल्याचेही शर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितले.

बडय़ा गुन्हेगारांवर कारवाई

जिह्यात राजकीय झूल पांघरुन गुन्हेगारी कारवाया करणाऱया बडय़ा गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यास पोलीस दलाला यश आले आहे. यापुढेही कोणाचाही मुलाहिजा राखला जाणार नसल्याचे सांगत गुन्हा केल्यास कारवाई अटळ असल्याचा इशाराही शर्मा यांनी दिला. ते म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नाकाबंदी व कोम्बींग ऑपरेशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. याचे चांगले ‘रिझल्ट’ येत आहेत. अनेक सराईत गुन्हेगार पोलिसांच्ंया हाताला लागत आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱयांना शिस्त लागत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. सांगली शहरचे निरीक्षक मिलिंद पाटील यांच्यासह गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके व कर्मचाऱयांचेही त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले.

पवन्यासह टोळीवर 17 गुन्हे

पवन्या साळुंखे हा सराईत चोरटा आहे. त्याच्यासह समर्थ पवार व अन्य दोघांच्या विरोधात तब्बल 17 गुह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी शहर, पंढरपूर शहर, विटा, मिरज शहर, संजयनगर, विश्रमाबागसह सांगली शहर पोलीस ठाण्याचा समावेश आहे. यामध्ये घरफोडी, जबरी चोरी, मोटारसायकल चोरी, मारहाण, मारामारीसह खंडणीच्या गुह्यांचा समावेश आहे.

Related posts: