|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ात भाजपचे पत्ते अद्याच ‘क्लोज’च!

जिल्हय़ात भाजपचे पत्ते अद्याच ‘क्लोज’च! 

शिवसेनेकडून मिळालेल्या भुमिकेमुळे नाराजी

प्रतिनिधी/ रत्नागिरी

केंद्रातील सत्ताधारी व राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख असलेला भाजपची रत्नागिरी जिल्हय़ातील स्थिती गेली अनेक वर्षे छोटय़ा भावाचीच राहीली आहे. गत 4 वर्षात पक्षाचे शिवसेनेसोबतचे संबध प्रचंड संघर्ष व तणावाचे राहीले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी युती होऊनही ज्यांच्याविरोधात संघर्ष केला त्यांच्यासाठीच मते मागणे भाजपसाठी कठीण बनले आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी सेनेचे काम न करण्याची भुमिका घेतली असून अद्यापही भाजप नेते प्रचारात सक्रीय झालेले नाहीत. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सेनेकडून सुरू असून भाजपने अद्यापही आपले पत्ते न उघडल्याने सेनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत यावर तोडगा निघाला तरच मनोमिलनाची चिन्हे आहेत.

  जिल्हय़ता भाजप-संघ विचारांची मोठी परंपरा आहे. 1957 ला रत्नागिरी जिह्यातून जनसंघाचे खासदार प्रेमजीभाई आसर हे निवडून गेले होत़े त्यानंतर 1977 आणि 1980 ला जनसंघाचे कार्यकर्ते ऍड़ बापुसाहेब परूळेकर हे जनता पक्षाच्या तिकीटावर विजयी झाले. त्यानंतर जिह्यात भाजपचे अनेक आमदार झाले. गुहागरमध्ये तर प्रदिर्घ काळ भाजपचे आमदार होते. मात्र अलिकडच्या काळात सेनेबरोबरच्या युतीनंतर शिवसेची ताकद वाढत गेली व भाजपची स्थिती दुर्बळ झाल्याचे चित्र आहे. मात्र गत विधानसभा निवडणुकीनंतर स्वबळाच्या मात्रेवर पुन्हा भाजप जोर धरू लागली.

संघ परिवाराचे मजबूत जाळे

दुसऱया बाजूला रत्नागिरी जिह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ यांच्या जुन्या कामांची पेरणी असल्याने मतदारांची संख्या आजही हजारो नव्हे तर लाखेंच्या घरात टिकून आह़े यामुळे भाजपला कितीही दुर्बळ म्हटले तरी प्रत्येक तालुक्यात लक्षणीय मते पडत आहेत़ देवरूख, चिपळूणमध्ये तर पक्षाचे नगराध्यक्ष कार्यरत आहेत़ दापोली, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण नगरपरिषदांमध्ये पक्षाला नोंद घेण्यासाठी मते पडली आहेत़ त्यामुळे जिह्यात सध्या इंदिरा काँग्रेसपेक्षा आपली स्थिती चांगली आह़े, असा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांना करण्यास पुरेसा वाव आह़े

ताणलेले संबंध

गेल्या पाच वर्षात रत्नागिरी जिह्यात शिवसेना-भाजप यांचे संबंध टोकाचे ताणले गेले आहेत़ तालुकास्तरीय असलेल्या विविध समित्यांवर नियुक्त्या असोत अथवा विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या असोत त्या पालकमंत्र्यांच्या शिफारशीने होत असतात़ या नियुक्त्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांना योग्य स्थान न †िमळाल्याची तक्रार होत आह़े

डावलल्याची भावना

रत्नागिरी जिह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत़ आमदारांच्या शिफारशीने काही समित्या बनविल्या जातात़ याही समित्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना पुरेसे स्थान मिळालेले नाह़ी जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील भाजपचे कार्यकर्ते योग्य त्या संख्येत घेतले गेले नाहीत़ खासदारांच्या शिफारशीने होणाऱया दूरध्वनी सल्लागार समितीसारख्या समितीतही भाजप कार्यकर्त्यांना डावलले गेल़े अशा तक्रारी आहेत़ खासदारांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांची गेल्या 5 वर्षात कधीच विचारपूस केली नाही, असा रोष कार्यकर्त्यांमध्ये आह़े

ताकद दाखवण्याची संधी हुकली

गत विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापली ताकद वाढवण्यास सुरूवात केली त्यातून एकमेकांवर कुरघोडीचाही प्रयत्न झाला. ‘शतप्रतिशत भाजप’, ‘मेरा बुथ सबसे मजबूत’ अशा घोषणा देत गाव पातळींवर शिवसेनेला आव्हान देण्याचे काम गेली 4 वर्षे सुरू होते. त्यातून लोकसभा निवडणुकीत सेनेविरोधात उमेदवार देण्याची तयारी भाजपने चालवली होती. त्यासाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नावाची मागणी होत होती. मात्र युतीचा निर्णय झाल्याने ताकद दाखवण्याची भाजपची संधी हुकली. युतीच्या जागावाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड हे दोन्ही मतदारसंघ सेनेच्या वाटय़ाला गेल्याने ज्या सेनेविरोधात संघर्ष केला त्याच पक्षासाठी मते मागण्याची वेळ भाजपवर आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

इन्कमींग वाढले

गेल्या 5 वर्षात रत्नागिरी जिल्हा भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग झाले आह़े शशिकांत धाडवे, शशिकांत चव्हाण, प्रमोद अधटराव, सुरेश गुरव, महेंद्रशेठ जैन, राजेश मयेकर, रश्मी कदम, चंद्रकांत लिंगायत, अमजद बोरकर, राजेश सावंत, पोफळीचे वामनराव पवार, दसपटीचे शिंदे, सतीश मोरे, लतिका जोशी, स्मिता जावकर, अभिजीत शेटय़े असे प्रत्येक तालुक्यात डझनावारी दखलपात्र कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत़

कुरघोडय़ा सुरूच

एका बाजूला शिवसेना सचिव भाजपच्या नेत्यांना भेटून युतीचे कामकाज सुरू करावे म्हणून विनवत आहेत़ तर त्याचवेळी सेनेचे पंचायत समिती सदस्य भाजप महिला सरपंचाविरोधात फौजदारी दाखल करण्याचा आग्रह धरतात यावरून दोन्ही पक्षातील कुरघोडय़ा सुरूच असल्याचे दिसून येते. त्यामुळे मनोमिलन होणे अवघड दिसत आह़े

 विनायक राऊत, अनंत गीते यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी चिन्हे असून दोन्ही उमेदवार भाजपच्या सहकार्यासाठी आतूर झाल्याचे दिसून येत आह़े यावेळी शिवसेनेकडून सत्ता सहभागाचे निश्चित आश्वासन पा†िहजे, असे भाजप कार्यकर्ते म्हणत आहेत़ भाजप कार्यकर्त्यांनी अद्याप निवडणुकीचे काम सुरू केले नसून मुख्यमंत्र्यांच्या सोबत होणाऱया बैठकीची ते वाट पाहत आहेत़ मात्र यावर तोडगा न निघाल्यास सेनेला फटका व विरोधकांना फायदा होण्याची शक्यता आहे.

Related posts: