|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाणबंदीचा भाजपवर परिणाम होणार नाही

खाणबंदीचा भाजपवर परिणाम होणार नाही 

प्रतिनिधी/ मडगाव

खाणबंदी ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरून लागू झाली आहे. हा तिढा सोडविण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. त्यातून गोव्यातील खाण व्यवसाय लवकरात लवकर सुरू होईल, असा विश्वास वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी शुक्रवारी  मडगाव रवींद्र भवनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. तसेच खाणबंदी ही भाजपाने लादलेली नाही. त्यामुळे खाणबंदीचा परिणाम येणाऱया लोकसभेच्या निवडणुकीत भाजपवर होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

भाजप सरकार खाणबंदीचा प्रश्न व त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच भाजपशिवाय आणखी कोणताही पक्ष या समस्या सोडविण्यात यशस्वी ठरणार नाही याची खात्री राज्यातील लोकांना आहे, असेही काब्राल पुढे म्हणाले. काँग्रेसच्या कार्यकाळात बेकायदेशीररीत्या खाणी सुरू करून राज्यात अनेक प्रकारचे घोटाळे करण्यात आले. तेव्हा लोकांनी प्रामाणिकपणे काम करणाऱया सरकारलाच पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज देशात अनेक प्रकारची विकासकामे होत आहेत. मोदी यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. त्यामुळे आज आपला देश सुरक्षित नेतृत्वाखाली वाटचाल करत आहे, असे ते म्हणाले. देशाचा आणखी विकास व्हावा यासाठी पुन्हा एकदा भाजपलाच लोकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आम्ही प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी कार्य करतो. तेव्हा राज्यातील लोक आमच्या कामाचे फळ आम्हाला देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मगो पक्ष सरकारचा एक घटक असून आम्हाला त्यांची गरज आहे. तेव्हा त्यांनी सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होईल असे काही करता कामा नये. यासाठी मगो पक्षाचे नेते असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी योग्य निर्णय घ्यावा. ते एक अनुभवी नेते असल्याने योग्य तो निर्णय घेतील यावर आपल्याला पूर्ण विश्वास आहे, असे काब्राल म्हणाले. राज्यातील लोकांनी सौरउर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी 50 ते 60 टक्के सब्सिडी दिली जाईल.  जास्तील जास्त लोकांनी सौरउर्जेचा उपयोग करावा यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले

Related posts: