|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांना मसूदच्या सुटकेचा निर्णय मान्य होता : अमित शाह

सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांना मसूदच्या सुटकेचा निर्णय मान्य होता : अमित शाह 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्मया मसूद अझहरची सुटका कोणी केली ? असा प्रश्न विचारणाऱया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या ब्लॉगमधून काही गोष्टींची आठवण करुन दिली आहे. विमान अपहरणाच्या घटनेनंतर तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीला सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग दोघेही उपस्थित होते.

 

देशाच्या भावनेचा विचार करुन त्यावेळी सर्वपक्षांनी मिळून मसूद अझहरची सुटका करण्याचा आणि प्रवाशांना परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता असे शाह यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची होती. मसूद अझहरची सुटका का केली ? हा प्रश्न उपस्थित करुन दुर्देवाने राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत शाह यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

 

Related posts: