|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सीआरपीएफकडून आंध्रमध्ये 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान

सीआरपीएफकडून आंध्रमध्ये 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान 

विशाखापट्टणम

 आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवादी यांच्यादरम्यान शनिवारी सकाळी चकमक झाली. चकमकीदरम्यान 198 बटालियन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन नक्षलवादी मारले गेले आहेत. विशाखापट्टणम जिल्हय़ाच्या पेडाब्यालू भागातील चकमकीत एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशभरातील नक्षलग्रस्त भागांमध्ये जिल्हा पोलिसांकडून जागरुकता कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. नक्षलवादाने ग्रस्त प्रभावित भागातील लोकांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.  नक्षलवादाच्या विरोधात लोकांमध्ये जागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मागील काही काळात नक्षलवादाचा बीमोड करण्याच्या दृष्टीने प्रशासनाला मोठे यश प्राप्त झाले आहे.

Related posts: