|Sunday, April 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » कुटुंबांशिवाय वाढदिवसाचा आनंद अपूर्ण : शिवानी

कुटुंबांशिवाय वाढदिवसाचा आनंद अपूर्ण : शिवानी 

झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ लोकप्रिय मालिका आणि त्यातील पात्रं शीतल आणि अजिंक्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. शीतल म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर हिचा नुकताच वाढदिवस झाला आणि वाढदिवसानिमित्त तिच्या सहकलाकारांनी तिला एक खास सरप्राईज दिलं.

मालिकेतील यास्मिन आणि शिवानीची हेअरड्रेसर यांनी रात्री 12 वाजता तिला बिल्डिंगच्या टेरेसवर नेलं आणि तिकडे शीतलच्या मालिकेची कास्ट आणि क्रू हजर होती. पूर्ण टेरेस फुग्यांनी सजवलं होतं. शिवानीने केक कापला आणि एक छोटी पार्टी केली. शिवानीच्या वाढदिवसानिमित्त तिचे आई-वडीलही तिला भेटायला मुंबईवरून साताऱयाला गेले. शिवानी सेटवर आली तेव्हा परत सेटवर सर्व कलाकारांनी शिवानीला केक कापायला लावला. शिवानीसाठी हे सरप्राईज खूप मोठं होतं. याबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, वाढदिवसाचा दिवस कुटुंबीयांसह साजरा करण्यास मिळावं यासारखा दुसरा आनंद जगात नाही. त्यांच्याशिवाय वाढदिवसाचा आनंद अपूर्ण आहे. ‘लागीरं झालं जी’च्या माझ्या या कुटुंबानेदेखील मला खूप मोठं सरप्राईज दिलं आणि हा वाढदिवस मी कधीच विसरू शकत नाही.

Related posts: