|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » नेदरलँडमध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू,अनेक जखमी

नेदरलँडमध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू,अनेक जखमी 

ऑनलाईन टीम / ऍमस्टरडॅम :

नेदरलँडच्या उटेक्ट शहरातील एका ट्राममध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

उटेक्ट येथे झालेल्या बेछूट गोळीबार झाला असून, त्यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत.सभोवतालच्या परिसराला वेढा घालण्यात आला असून, या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती उटेक्ट पोलिसांनी ट्वटिरवरून दिली आहे.हा हल्ला दहशतवाद्यांनी घडवल्याची शक्मयता व्यक्त करत त्यादृष्टीने तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक प्रसारमाध्यमांनी या घटनेनंतरची काही प्रकाशचित्रे प्रकाशित केली असून, यामध्ये मास्क लावलेले पोलीस तपास करताना दिसत आहेत.