|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » अमूल्य व्यक्तिमत्त्वाला अमूलची श्रद्धांजली

अमूल्य व्यक्तिमत्त्वाला अमूलची श्रद्धांजली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना अमूलने  श्रद्धांजली वाहिली आहे. पर्रिकर यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो वापरुन अमूलने  त्यांना आदरांजली वाहिली. ‘हर गाव का मनोहर’ असं शीर्षक या फोटोला देण्यात आले  आहे. ‘आदरणीय राजकारणी आणि नेत्याला सलाम’, अशा शब्दांमध्ये अमूलने  पर्रिकरांना श्रद्धांजली अर्पित केली. 

रविवारी  पर्रिकर यांनी पणजीत अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. तीनवेळा गोव्याचे  मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या पर्रिकर यांच्या निधनाबद्दल सर्वांनीच शोक व्यक्त केला. अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या पर्रिकरांच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पर्रिकर यांनी संरक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती.