|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » घराणेशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाईल- मोदी

घराणेशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाईल- मोदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी लिहितात, आमच्या सरकारने  कौटुंबिकतंत्रापेक्षा प्रामाणिकपणाला निवडले. संसद, संविधान, सरकारी संस्थान, सेना आदीचा काँग्रेसच्या कार्यकाळात दुरुपयोग करण्यात आला. काँग्रेसने लष्कराला नेहमीच कमाईचे साधन समजले.  2014मध्ये जनतेने भ्रष्टाचारातून मुक्ती मिळवण्यासह चांगल्या भविष्यासाठी मतदान केले.

एनडीए सरकार ‘Family First’ ऐवजी ‘India First’ या भावनेने काम करते. काँग्रेसवर मोदींनी वंशवादाचा आरोप केला आहे. काँग्रेसने. देशाच्या संस्थांना कमकुवत केले आहे. मोदींनी यावेळी जनतेसाठी राबवलेल्या योजनांचाही उल्लेख केला आहे. मोदी म्हणाले, स्वच्छता 2014मध्ये फक्त 38 टक्के होती, पण आता ती वाढून 98 टक्के झाली आहे. तसेच थेट फायदा, कर्ज मिळण्याची सुलभ प्रक्रिया, पछाडलेल्या वर्गांसाठी चालवलेल्या योजनांचाही हवाला दिला आहे.

आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्यात आली. एखादी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास थेट तुरुंगात टाकण्याचा कायदा काँग्रेसने आणला होता, आणीबाणी लावून काँग्रेसने संविधान आणि न्यायालयांचा अवमान केला होता. यूपीए सरकारने सीबीआय, आयबी आणि रॉ सारख्या गुप्तचर संस्थांचा वेळोवेळी दुरुपयोग केला. मोदी यांनी योजना आयोगावरही टीका केली. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी योजना आयोगाला A bunch of jokers म्हणजेच जोकरांचा समूह असे  म्हटले होते.  त्यावेळी योजना आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. मनमोहन सिंग होते. काँग्रेस सरकार संस्थांबाबत काय विचार करते, हे यावरून स्पष्ट होत आहे. काँग्रेसनं लष्कराला नेहमीच कमाईचे  एक साधन समजले. त्यामुळेच जवानांना काँग्रेसने कधीही सन्मान दिला नाही. ज्याचे ते पात्र आहेत. पुलवामा हल्ल्यावर मोदी म्हणतात, आमचं हवाई दल दहशतवाद्यांवर हल्ले करत आहेत, पण काँग्रेस त्यांच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मोदींनी एकंदरीतच त्यांच्या ब्लॉगमधून काँग्रेसचे वाभाडे काढले आहेत.