|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » धुळ्यात भाजपच्या सुभाष भामरेंचा पराभव करणे हे एकच लक्ष्य : अनिल गोटे

धुळ्यात भाजपच्या सुभाष भामरेंचा पराभव करणे हे एकच लक्ष्य : अनिल गोटे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

 धुळे महानगरपालिका निवडणुकांमधून डावलल्याने नाराज असलेले भाजपने आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजवविरोधात लढण्याची भूमिका अनिल गोटे यांनी घेतली आहे. तसेच धुळ्यात भाजप उमेदवाराचा पराभव करणे हेच आपले  लक्ष्य असल्याचे  त्यांनी म्हटले  आहे.

धुळ्यात भाजप पक्षात मोठा भ्रष्टाचार, अनागोंदी माजली आहे. पक्षातील ही घाण आपल्याला साफ करायची आहे. सरंक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा याठिकाणी पराभव करणे हे एकमात्र लक्ष्य असल्याचंही गोटे यांनी स्पष्ट केले आहे.  शरद पवारांना माझी भूमिका सांगण्यासाठी मी त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मला कशी मदत करायची हा त्यांचा निर्णय असणार आहे. तसेच शरद पवारांना पुन्हा भेटणार असल्याचेही गोटे यांनी स्पष्ट केले आहे. अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेतल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यात तेलगी प्रकरणावरुन वाद झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल गोटे यांचा ‘तेलगीचा मित्र’ म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. मात्र शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने अनिल गोटे वैर विसरुन शरद पवारांच्या भेटीला गेले होते.