|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » आचारसंहिता भंगाच्या तक्रारींऐवजी नागरिकांकडून सेल्फीसह हाय-हॅलोचे मेसेज, ॲप अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे

आचारसंहिता भंगाच्या तक्रारींऐवजी नागरिकांकडून सेल्फीसह हाय-हॅलोचे मेसेज, ॲप अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे 

ऑनलाईन टीम / नाशिक :

 आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून  ‘सी व्हिजिल’ ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपवर एकीकडे निवडणुकीच्या काळात सध्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र हे ॲप निवडणूक अधिकाऱ्यांसाठी चांगलेच डोकेदुखी ठरते आहे. कारण या ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींऐवजी नागरिक सेल्फींसोबतच हाय, हॅलो आणि गुडमॉर्निंगचे मेसेजेस टाकत आहे.

नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाईल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर राज्यभरात 717 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या 294 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र  नाशिकमध्ये हे ॲप निवडणूक अधिकाऱ्यांसाठी चांगलेच डोकेदुखी ठरते आहे. कारण या ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींऐवजी नागरिकांनी सेल्फींसोबतच हाय, हॅलो आणि गुडमॉर्निंगचे मेसेजेस केले आहेत. आता अशा लोकांवर प्रशासन आता त्यांच्यावर कारवाई करण्याचा तयारीत आहे