|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » रंग बदलने वालोंको भी होली की शुभकामनाएं : धनंजय मुंडे

रंग बदलने वालोंको भी होली की शुभकामनाएं : धनंजय मुंडे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांनी रंगपंचमीच्या शुभेच्छा देताना शिवसेना आणि भाजपावर निशाना साधला आहे. वेळोवेळी रंग बदलून सर्वांनाच चकीत करणाऱयांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा असे ट्वटि धनंजय मुंडे यांनी केले आहे. नैसर्गिक रंगांचा वापर करुया, पर्यावरण पूरक धूलिवंदनचा आनंद लुटूया असे आवाहनही मुंडे यांनी ट्विटर केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रत्येक पक्षाने प्रचाराचा नाराळ फोडला आहे.

 

धनंजय मुंडे यांनी दोन ट्वटि करत मोदींसह शिवसेना आणि भाजपावर खोचक टीका केली आहे. बुरा ना मानो होली है,असे म्हणत मुंडे यांनी युतीवर टिकास्त्र सोडले आहे. कभी तू फकीर लगता है, कभी आवारा लगता है, कभी तू चायवाला लगता है, कभी चोर चौकीदार लगता है असे ट्वटि करत मुंडे यांनी मोदीवर निशाना साधला आहे. तर दुसऱ्या एका ट्वटिमध्ये मुंडे यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे. यामध्ये शिवसेना नेत्यांच्या राजीनामा देण्यावरून मुंडे यांनी खोचक टीका केली आहे.