|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या

पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / पंढरपूर : 

मंत्रालयीन सचिवाने आपल्या पत्नीवर गोळीबार करुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असलेल्या विजय पवार यांनी घरगुती वादातून काल रात्री आपल्या पत्नीवर 2 गोळ्या झाडल्या.

यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. पवार यांच्या पत्नीला उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
विजयकुमार भागवत पवार मंगळवेढ्यातील मरवडे गावचे रहिवासी असून सध्या ते मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते. घरगुती वादातून त्यांनी मध्यरात्री एक वाजता राहत्या घरी आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी पत्नीवर गोळीबार केला. त्यांच्या पत्नी सोलापूर येथे  खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.  मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावचे रहिवासी असलेले विजय पवार हे तालुक्यातील पहिले जिल्हाधिकारी बनले होते. नुकतीच त्यांची पोस्टींग मंत्रालयात कौशल्य विकास विभागात झाली होती.