|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » पुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचे : सॅम पित्रोडांनी

पुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचे : सॅम पित्रोडांनी 

ऑनलाईन टीम /  नवी दिल्ली :

काही जण येऊन हल्ले करतात, त्यासाठी संपूर्ण देशाला दोषी धरणार का?, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेते सॅम पित्रोडांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानसाठी जोरदार बॅटिंग केली आहे. पुलवामा हल्ल्यावर भाष्य करताना पित्रोडांनी हा सवाल उपस्थित केला. यामुळे मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईवर 26/11चा हल्ला झाला. त्यावेळी आम्हीदेखील विमाने  पाठवू शकत होतो. मात्र असे करणे योग्य नाही. तुम्ही अशाप्रकारे वागू शकत नाही, अशा शब्दांमध्ये पित्रोडांनी अप्रत्यक्षपणे एअर स्ट्राइकवर भाष्य केले.

पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला एअर स्ट्राइक यावर सॅम पित्रोडांनी भाष्य केले. ‘मला हल्ल्यांविषयी फारसे  माहीत नाही. पण असे हल्ले होतच असतात. मुंबईवरदेखील हल्ला झाला होता. त्यावेळी आम्हीदेखील विमाने  पाठवू शकलो असतो. मात्र ते योग्य नाही. तुम्ही असे  वागू शकत नाही, असे  मला वाटते,’ अशा शब्दांमध्ये पित्रोडांनी पुलवामा हल्ला आणि हवाई दलाच्या हल्ल्यावर भाष्य केले. काँग्रेसचे परदेश प्रमुख असलेले पित्रोडा राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात.