|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश

गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीर याने भाजपात प्रवेश केला. गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केल्याने पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपात प्रवेश केला असल्याचे यावेळी गौतम गंभीरने सांगितले देशासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल यावेळी गौतम गंभीरने भाजपाचे आभार मानले.

      गौतम गंभीरला लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यासंबंधी बोलण्यास यावेळी अरुण जेटली यांनी नकार दिला. तिकीट देण्यासंबंधीचा निर्णय निवडणूक समितीवर सोडून देऊयात. गौतम गंभीर यांना योग्य ती जबाबदारी देण्यात येईल असे त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागांवर विजयी पताका फडकवण्यासाठी भाजपा पुरेपूर प्रयत्न करत असून काही मोठे बदल केले जात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. गौतम गंभीरचा प्रवेश त्याचाच एक भाग असल्याचे म्हटले जात आहे.