|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » दिल्लीत ‘जैश-ए-मोहम्मद’ चा दहशतवादी सज्जाद खानला अटक

दिल्लीत ‘जैश-ए-मोहम्मद’ चा दहशतवादी सज्जाद खानला अटक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

पुलवामा हल्ल्यातील सूत्रधर मुदस्सरि याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद खान याला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली आहे. सज्जाद खानला झालेली अटक हे सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जात आहे.

 पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या भीषण हल्ल्याचा सूत्रधर मुदस्सरि अहमद खान याला सुरक्षा दलांनी 11 मार्च रोजी त्राल येथील चकमकीत कंठस्नान घातले होते. मुदस्सरि हा पुलवामा येथील त्रालच्या मिर मोहल्ल्यात राहत होता. 2017 मध्ये त्याने जैश- ए – मोहम्मदमध्ये शिरकाव केला होता. त्यानेच स्फोटातील गाडी आणि स्फोटके यांची जमवाजमव केली होती. दिल्लीतील सज्जाद खान हा मुदस्सरिच्या संपर्कात असल्याचे सुरक्षा दलांच्या तपासातून उघड झाले होते. यानुसार दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सज्जाद खानला लाल किल्ला परिसरातून गुरुवारी रात्री अटक केली. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी सज्जादची कसून चौकशी करत आहेत.