|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून संजय शिंदेंना उमेदवारी

माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून संजय शिंदेंना उमेदवारी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मला लोकसभेला माढा येथून उभे रहा असा आग्रह सगळय़ांनी केला होता. यासंदर्भात टेंभुर्णीला एक बैठक झाली त्या बैठकीत मला तुम्ही निवडणुकीला उभे रहा अशी विनंती करण्यात आली. संजय शिंदे हे घरातलेच आहेत, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असे का म्हणायचे? ते घरातलेच आहेत असे शरद पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघातर्फे आणि काँग्रेसच्या सहमतीने मी संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर करतो आहे असं शरद पवार यांनी जाहीर केले आहे.

माढा येथील लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर ही उमेदवारी कोणाला दिली जाणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं होते. ही उमेदवारी राष्ट्रवादीतर्फे संजय शिंदे यांना जाहीर करण्यात आली आहे. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी राणा जगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचेही शरद पवार यांनी जाहीर केले.