|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » जानकरांना डावलून, बारामतीतून रासप आमदाराच्या पत्नीला भाजपाची उमेदवारी

जानकरांना डावलून, बारामतीतून रासप आमदाराच्या पत्नीला भाजपाची उमेदवारी 

ऑनलाईन टीम / मुंबई  : 

 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री उशिरापर्यंत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु होती. या बैठकीत अनेक उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र यातील महत्त्वाचे म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून रासपचे दौडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

 

आमदार राहुल कुल रासपचे आमदार असले तरी मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुल यांची जवळीक वाढली होती त्यामुळे कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा आहे. मात्र या सगळय़ा राजकीय घडामोडींमध्ये मागच्या निवडणुकीत भाजपाला साथ देणाऱया महादेव जानकर यांना डच्चू देत मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहे. एकीकडे रासप आमदारांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली तर दुसरीकडे महादेव जानकर यांना बारामतीतून तिकीट नाकारले.