|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वोक्सवॅगन पोलो’ ठरली सर्वोत्कृष्ट कार

वोक्सवॅगन पोलो’ ठरली सर्वोत्कृष्ट कार 

प्रतिनिधी/ बेळगाव

देशातील रस्त्यांवरून धावणाऱया सर्व कार्सच्या चाचणीमध्ये वोक्सवॅगन कंपनीच्या पोलो कारने सर्वोत्कृष्ट कारचा सन्मान मिळविला आहे. प्रिमीयम कॉम्पॅक्ट गटातील स्पर्धेमध्ये ‘वोक्सवॅगन पोलो’ कार सर्वप्रथम क्रमांकाची कार ठरली आहे. सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाचा मान मिळविण्याची कामगिरी या कारने केली आहे.

इंडिया इनिशीयल क्वॉलिटी स्टडीज या गुणवत्ता चाचणीच्या क्षेत्रातील नामवंत संस्थेने सर्वेक्षणामधून या कारची निवड केली आहे. ग्राहकांनी कारची खरेदी केल्यानंतर पाहिल्या सहा माहिन्यात वाहनांविषयी काही तक्रारी येतात. या तक्रारींच्या सर्व मुद्दय़ांचा विचार करून ही चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये ग्राहकांच्या अपेक्षापूर्ती आणि सेवांच्या पूर्ततेचा घटक विचारात घेऊन वोक्सवॅगन पोलो ही कार सर्वोत्कृष्ट असल्याचे ठरविण्यात आले. यासंदर्भात कंपनीचे संचालक स्टीफन क्नॅप यांनी कारच्या गुणवत्तेचा निकष महत्त्वाचा ठरल्याची माहिती दिली