|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » किरीट सोमय्यांनी केलेली टीका शिवसैनिक विसरलेले नाहीत – राहुल शेवाळे

किरीट सोमय्यांनी केलेली टीका शिवसैनिक विसरलेले नाहीत – राहुल शेवाळे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजपचे ईशान्य मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्तिगत पातळीवर अगदी खालच्या दर्जाची टीका केली होती. ही बाब शिवसैनिक विसरलेले नाहीत, त्यामुळे दोन्ही पक्षांचे वरि÷ नेते ईशान्य मुंबई मतदार संघाबाबत निर्णय घेतील, अशी माहिती शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

राहुल शेवाळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत म्हणाले, किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर अनेकदा अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. शिवसैनिक सोमय्या यांनी केलेली टीका विसरलेले नाहीत. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदार संघात किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. दरम्यान दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचा वाद आता मिटलेला आहे. या मतदार संघासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे दोघेही आग्रही होते. परंतु आठवले यांनी माघार घेतली असून शेवाळेंच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.