|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खानापूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार

खानापूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

प्रतिनिधी / बेळगाव

खानापूर तालुक्मयातील एका अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला आहे. या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून खानापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

रविवारी सायंकाळी झुंजरवाड (ता. खानापूर) येथील एका 17 वषीय अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या संबंधी खानापूर पोलीस स्थानकात भा.दं.वि. 363, 376 व पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

अपहरण करुन या मुलीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले असून 18 मार्च रोजी ही घटना घडली आहे. दरम्यान शनिवारी रात्री हुक्केरी तालुक्मयातील उळागड्डी खानापूर येथील अपहरण प्रकरणातील एका अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.