|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » नरेश गोयल यांचा जेट एअरवेज चेअरमनपदाचा राजीनामा

नरेश गोयल यांचा जेट एअरवेज चेअरमनपदाचा राजीनामा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

गेल्या काही काळापासून आर्थिक संकटात सापडलेली विमान वाहतूक कंपनी जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नरेश गोयल यांच्यासोबत त्यांची पत्नी अनिता गोयल यांनीही जेट एअरवेजमधील आपले पद सोडले आहे.

नरेश गोयल हे जेट एअरवेजच्या मुख्य प्रवर्तकांपैकीएक होते. दरम्यान, कंपनीची आर्थिक बाजू कोलमडू लागल्यानंतर स्वतःहून नरेश गोयल यांनी स्वतःहून पुढाकार घेत राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यादरम्यान त्यांनी जेटच्या कर्मचाऱयांना एक भावूक पत्र लिहून आपण कुठलेही बलिदान देण्यास तयार आहोत, असे म्हटले होते.

नरेश गोयल हे पदावरून दूर झाल्यानंतर आता जेटच्या कर्जपुरवठादारांच्या संघटनेचे सदस्य त्यांच्याकडील 51 टक्के भागीदारीचे एअरलाइन्समध्ये विलिनीकरण करू शकतात. त्यानंतर येत्या काही आठवडय़ांमध्ये जेट एअरवेजसाठी नव्या खरेदीदाराचा शोध सुरू होईल. गोयल हे पदावरून दू झाल्याने आता जेट एअरवेजला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी सीईओ विनय दुबे यांच्यावर असेल.

दरम्यान, जेट एअरवेजला आपातकालीन निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त आहे. पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया 25 वर्षे जुन्या असलेल्या या विमान वाहतूक कंपनीला प्राधन्याने निधी देतील. कर्जपुरवठादारांकडून प्राधन्याने कर्ज मिळाल्याने जेट एअरवेजला मदत होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत या कंपनीला वाचवण्यासाठी काही नवीन योजना समोर येत नाही तोपर्यंत ही कंपनी चालू राहू शकेल.