|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » लोकसभा निवडणूक लढवणार नाही , श्रीनिवास वनगा यांची मातोश्रीवर घोषणा

लोकसभा निवडणूक लढवणार नाही , श्रीनिवास वनगा यांची मातोश्रीवर घोषणा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पालघर लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत माजी खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय मी स्वतः घेतला आहे, असे श्रीनिवास वनगा यांनी सांगितले. दरम्यान, श्रीनिवास वनगांच्या घोषणेनंतर शिवसेनेने पालघर लोकसभा मतदार संघातील उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.

 

शिवसेनेने भाजपाच्या ताब्यातील पालघर मतदारसंघ आपल्यासाठी मागून घेतला होता. तसेच या मतदारसंघातून माजी खासदार चिंतामण वगना यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी घोषणाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र काही अंतर्गत घडामोडीनंतर या मतदारसंघातील विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, अशी माहिती समोर आली. दरम्यान, त्यामुळे श्रीनिवास वनगा यांची पुढील भूमिका काय असेल याची उत्सुकला लागली होती. अखेर आज श्रीनिवास वनगा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वनगा म्हणाले की, तुम्ही सर्वांनी दिलेले प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. आता आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय मी स्वतः घेतला आहे.’’