|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे स्टार प्रचारक , 40 जणांची यादी जाहीर

राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे स्टार प्रचारक , 40 जणांची यादी जाहीर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येक पक्षांच्या सभांना सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यांसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. ज्यांचे पुत्र भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, ते विधनसभेचे विरोधी पक्षनेते राधकृष्ण विखे पाटील यांचाही स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण या दोघंचाही यादीत समावेश आहे.

 

या यादीत अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, डॉ. मनमोहन सिंह, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. तसेच कुमार केतकर, मोहम्मद अझरुद्दीन, नगमा मोराजी हे देखील महाराष्ट्रात पक्षाचा प्रचार करतील. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात फिरुन युथ काँग्रेसला सतत कार्यमग्न ठेवणारे सत्यजित तांबे यांचे नाव यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.