|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हजारो अनुयायांचे अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हजारो अनुयायांचे अभिवादन 

ऑनलाईन टीम / वाशिम :

भारतरत्न, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिह्यात सर्वत्र आज, 14 एप्रिल रोजी हर्षोल्लासात साजरी झाली. वाशिम येथील समाजबांधव, अनुयायांनी स्थानिक आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला हारार्पण करीत अभिवादन केले.

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त समाजबांधवांकडून ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासह काही ठिकाणी समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात आले. जिह्यातील शहरांसह ग्रामीण भागातही उत्स्फूर्त मिरवणुका काढण्यात आल्या. महिलांनी पांढऱया रंगाच्या साडय़ा; तर पुरूषांनीही पांढरे वस्त्र परिधन करून डोक्मयावर, गळय़ात निळा रुमाल घालून मोठय़ा संख्येने मिरवणूकांमध्ये सहभागी होते. या मिरवणूकांमध्ये इतरही जाती-धर्माच्या नागरिकांनी सहभागी होत सर्वधर्मसमभावाचा प्रत्यय दिला. या दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये किंवा शांततेचा भंग होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात ठेवल्याचे दिसून आले. प्रशासकीय कार्यालयांमध्येही डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.